मध्य रेल्वे पुणे विभागात डीसीएन कामासाठी काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट


भुसावळ (बुधवार, 7 ऑक्टोबर 2026) : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे यार्ड तसेच पुणे-दौंड विभागातील विद्यमान लेआउटमध्ये बदल करण्यासाठी डीसीएन कामाकरिता विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे. या कामामुळे भुसावळ विभागातून धावणार्‍या काही गाड्यांच्या वाहतुकीवर पुढीलप्रमाणे परिणाम होणार आहे. गाडी क्रमांक 12136 नागपूर-पुणे एक्स्प्रेस 10 रोजी हडपसर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. गाडी क्रमांक 11406 अमरावती-पुणे एक्स्प्रेस 10 रोजी हडपसर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. गाडी क्रमांक 11078 जम्मूतवी-पुणे एक्स्प्रेस 9 रोजी जम्मूतवी येथून सुटणारी गाडी हडपसर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.

गाडीचे ओरिजिनेशन
गाडी क्रमांक 12135 पुणे-नागपूर एक्स्प्रेस दिनांक 11 रोजी पुणे स्थानकाऐवजी हडपसर स्थानकावरून 5.45 वाजता सुटेल. रेल्वेच्या पायाभूत सुविधांची देखभाल तसेच प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हे देखभाल ब्लॉक आवश्यक असून प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !