‘सुप्रीम’ दिलासा ; जळगावातील माजी महापौर ललित कोल्हे यांना जामीन
‘Supreme’ Relief: Former Jalgaon Mayor Lalit Kolhe Granted Bail जळगाव (24 एप्रिल 2026) : जळगाव शहरात बनावट कॉल सेंटर चालवण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला होता शिवाय हे सेंटर जळगावचे माजी महापौर ललीत विजयराव कोल्हे यांच्या जागेत चालवण्यात आल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली होती. सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर सुप्रीम न्यायालयात अपिल केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला असल्याची माहिती त्यांच्या पत्नी सरिता कोल्हे-माळी यांनी दिली.
काय आहे प्रकरण ?
जळगावच्या ममुराबाद रोडवरील एल. के. फार्म येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तेथे बनावट कॉल सेंटर सुरू असल्याचे आढळले होते शिवाय या माध्यमातून विदेशी नागरिकांची फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी जागेचे मालक ललित कोल्हे यांच्यासह इतरांना अटक करण्यात आली होती. त्यांचा जामीन अर्ज जळगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयात फेटाळण्यात आल्यानंतर अर्ज उच्च न्यायालयात देखील अर्ज फेटाळण्यात आला होता.

सुप्रीम कोर्टातून दिलासा
यानंतर जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आल्यानंतर त्यांच्या जामीनावर युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. यामुळे त्यांची सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हे कुटुंबीय आणि त्यांच्या समर्थकांना यातून मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मध्यंतरी झालेल्या जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत ललित कोल्हे यांनी निवडणूक लढवून यात विजयदेखील मिळवला आहे.
