मंत्रोच्चार करून आजार बरे करण्याचा दावा करणार्या भोंदूचे कांड समोर : 200 व्हिडिओंसह औषधी जप्त
Fraudster claiming to cure ailments through chanting exposed: Medicines seized along with 200 videos. संगमनेर (25 एप्रिल 2026) : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच मंत्रोच्चार करून आजार बरे करण्याचा दावा करणार्या भोंदू राजेंद्र गडगे भोवती पोलिसांनी आता कारवाईचा फास आवळला आहे. या गडगेवर पोलिसांनी दत्ताधाम इथं कारवाई केली आहे. यावेळी 200 पेक्षा जास्त व्हिडीओ पोलिसांनी जप्त केले व 90 पेक्षा अधिक औषधे सुद्धा पोलिसांनी जप्त केली.
हजारो लोकांची फसवणूक
मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करत असल्याचा दावा करणारा बाबा पोलिसांच्या तावडीत आहे. संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील दत्तधाम सरकार नावाने या भोंदूने आपला दरबार सुरू केला होता. राज्यभरातून हजारो लोक त्याच्या भोंदूगिरीचे बळी ठरले.

संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील दत्तधाम सरकार नावाने भोंदू राजेंद्र गडगे हा दरबार भरवत होता. गेल्या कित्येक वर्षांपासून मंत्र तंत्राने दुर्धर आजार बरे करण्याचा त्याचा गोरखधंदा सुरू होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर हा भोंदू गजाआड गेला आहे. त्याच्या दरबारातून पोलीसांनी अनेक महत्वाचे पुरावे हस्तगत केले असून काही औषधाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. याने आजवर अनेकांचे आर्थिक, मानसिक आणी शारीरिक शोषण केले असून पिडीतांनी समोर यावं आणी गुन्हा दाखल कराव, असे आवाहन अंनिसच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनी केले.
200 व्हिडीओ सापडले
भोंदू राजेंद्र गडगे प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. पोलिसांनी गडगेची सगळी कुंटली बाहेर काढली आहे. पोलिसांनी गडगेकडून आतापर्यंत 200 पेक्षा अधिक व्हिडीओ जप्त केले आहे. त्याचबरोरब नाशिक पोलिसांनी दत्तधाम येथून 90 पेक्षा अधिक औषधे जप्त केली असून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवली आहे.
दरम्यान, गडगेकडून 13 प्रॉपर्टी खरेदीची माहितीही समोर आली आहे. याबद्दल सब-रजिस्ट्रार कार्यालयाकडून मालमत्तेची माहिती मागवली जाणार आहे. भोंदू गडगेकडे असलेल्या 10 वेगवेगळ्या बँकांमधील खात्यांचा तपास सुरू आहे. तसेच ‘पुत्र प्राप्ती’ प्रकरणी ग्रामीण रुग्णालयाकडून भोंदू गडगेला नोटीस सुद्धा बजावल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.
