फैजपूरात चोरटे ’सैराट’ ; गोदामातून शंभर गॅस सिलिंडर लांबवले


Thieves Run Wild in Faizpur ; 100 Gas Cylinders Stolen from Warehouse फैजपूर (25 एप्रिल 2026) : शहराजवळील पिंपरुड रोड परिसरातील ‘श्रीधर गॅस एजन्सी’च्या गोदामात चोरट्यांनी मध्यरात्री धुमाकूळ घालत तब्बल भरलेले शंभर सिलिंडर लांबवले. ही धक्कादायक चोरी शनिवारी पहाटे उघडकीस आली. या चोरीने या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही व तांत्रिक आधारावर चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

काय घडले फैजपूरात ?
फैजपूरातील पिंपरुड शिवारात ललित रघुनाथ राणे यांच्या मालकीचे भारत गॅसचे अधिकृत गोदाम आहे. शुक्रवार, 24 सायंकाळी एजन्सीचे कर्मचारी आणि संचालकाांनी गोदाम सुरक्षितपणे बंद केले होते. त्यावेळी गोदामात 14.2 किलो वजनाचे एकूण 209 भरलेले सिलिंडर होते तर शनिवारी सकाळी कर्मचारी गोदाम उघडण्यासाठी आले असता मुख्य गेटचे कुलूप तुटलेले असल्याचे दिसून आले.

गोदाम मालकांनी तातडीने पाहणी केली असता एकूण साठ्यापैकी 100 सिलिंडर चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. एका सिलिंडरची किंमत 3,118 रुपये असून, चोरट्यांनी एकूण तीन लाख 11 हजार 800 रुपयांचे सिलिंडर लांबवले. चोरट्यांनी मोठ्या वाहनाचा वापर केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आधीच शॉर्टेज त्यात चोरीची भर
सध्या आखाती देशांमधील तणावामुळे भारतासह जगभरात गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. देशात गॅस टंचाईचे सावट असून नागरिकांना एका सिलिंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अशा संकटकाळात फैजपूरमधील ‘श्रीधर गॅस एजन्सी’च्या गोदामातून चोरट्यांनी चक्क 100 भरलेले सिलिंडर चोरून नेल्याने ग्राहकांची गैरसोय वाढण्याची भीती आहे.

या प्रकरणी ललित राणे यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !