भरधाव दुचाकीने उडवले : जळगावातील तरुण ठार


Struck by Speeding Two-Wheeler : Youth from Jalgaon Killed जळगाव (25 एप्रिल 2026) : अज्ञात दुचाकीने दिलेल्या धडकेत जळगावातील तरुणाचा मृत्यू झाला. अक्षय राजेश पाटील (27) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर संबंधित दुचाकी चालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पायी जात असताना अपघात
पोलीस कॉलनी (एमआयडीसी) येथे राहणारा अक्षय पाटील हा धनदाई माता मंदिरासमोरून ‘लकी फर्निचर’ दुकानाच्या दिशेने पायी रस्ता ओलांडत होता. याच वेळी कुसुंबाकडून जळगावकडे येणार्‍या एका अज्ञात दुचाकी चालकाने आपले वाहन अत्यंत भरधाव वेगाने चालवून अक्षयला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अक्षयला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

अज्ञात वाहन चालकाचा सीसीटीव्हीद्वारे शोध
अपघात झाल्यानंतर जखमीला वैद्यकीय मदत करण्याऐवजी किंवा पोलिसांना कळवण्याऐवजी दुचाकी चालकाने तेथून पळ काढला. या प्रकरणाची माहिती मिळताच अक्षयचे वडील राजेश विठ्ठल पाटील यांनी एम.आय.डी.सी. पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !