अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ड्रीनर प्रोग्राममध्ये गोळीबार ; पंतप्रधान म्हणाले…!


Shooting outside a hotel in Washington attended by numerous celebrities, including US President Donald Trump वॉशिंग्टन (26 एप्रिल 2026) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया आणि उपराष्ट्रपती जेडी वेंस यांच्यासह अनेक मोठे अधिकारी उपस्थित असलेल्या वॉशिंग्टनमधील वार्षिक व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट डिनरदरम्यान गोळीबार झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. या हल्ल्यात एक अधिकारी जखमी झाला आहे. कोल टॉमस अ‍ॅलन (31) असे अटकेतील हल्लेखोराचे नाव आहे. शिक्षक आणि व्हिडीओ गेम डेवलपर म्हणून तो काम करतो व टोरान्समधल्या लॉस एंजल्स उपनगरात वास्तव्याला असल्याची माहिती आहे.

ट्रम्प म्हणाले, हा तर अमेरिकेच्या संविधानावर हल्ला
हल्ल्याच्या सुमारे दीड तासानंतर ट्रम्प यांनी माध्यमांना संबोधित केले. ते म्हणाले – अमेरिकेच्या संविधानावर हल्ला झाला. सीक्रेट सर्व्हिसने माझा जीव वाचवला. सुरक्षा कर्मचार्‍यांनी शौर्याने काम केले. ज्या अधिकार्‍याला गोळी लागली, तो सुरक्षित आहे. त्याने बुलेटप्रूफ जॅकेट घातले होते. हल्लेखोराजवळ शक्तिशाली बंदूक होती.

आजची संध्याकाळ खूप धावपळीची
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून लिहिले, वॉशिंग्टनमध्ये आजची संध्याकाळ खूपच गजबजलेली होती. सीक्रेट सर्व्हिस आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणांनी उत्कृष्ट काम केले. त्यांनी तत्काळ कारवाई केली. हल्लाखोराला पकडण्यात आले आहे आणि मी सुचवले आहे की, आपण कार्यक्रम सुरू ठेवावा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारताची भूमिका स्पष्ट करीत ट्रम्प यांच्या सुरक्षेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्रपती हे वॉशिंग्टन डीसीमधील घटनेनंतर सुरक्षित आहेत, हे जाणून समाधान वाटले. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. लोकशाहीत हिंसेला कोणतंही स्थान नाही आणि अशा कृत्यांचा पूर्णपणे निषेध केला पाहिजे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !