डीजेवर नाचताना धक्का : वादातून तरुणाची निर्घृण हत्या


Shove While Dancing to DJ : Youth Brutally Murdered Following Dispute बुलढाणा (26 एप्रिल 2026) : लग्न समारंभात डीजे वर नाचताना लागलेल्या धक्क्यातून वाद उफाळल्याने टोळक्याने 23 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने हत्या केली. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बर्डे प्लॉट भागात रात्री ही धक्कादायक घटना घडली. शोएब खान अमीन खान (23, बर्डे प्लॉट, खामगाव) असे मृताचे ाव आहे.

काय घडले शहरात
बडे प्लॉट भागातील स्मशानभूमीजवळ एका लग्न समारंभामध्ये डीजे सुरू असताना युवक नाचत होते. यामध्ये शोएब खान अमीन खान हा सुद्धा नाचत असताना त्याचा दुसर्‍या एका युवकाला धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून अचानक वाद उफाळून आल्याने परिसरातील चार ते पाच जणांनी शोएब खान अमीन खान यांच्यासोबत वाद घातला आणि चार ते पाच जणांनी संगणमत करून त्याला ठार मारले.

धारदार शस्त्राने हल्ला
नाचताना धक्का लागल्याच्या या क्षुल्लक कारणावरून सुरुवातीला बाचाबाची झाली मात्र या वादाचे रूपांतर थोड्याच वेळात हिंसक संघर्षात झाले. परिसरातील 4 ते 5 जणांनी संगणमत करून शोएब खान याच्यावर धारदार शस्त्र आणि फायटरने भीषण हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, शोएब खान याचा जागीच मृत्यू झाला. परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !