जळगाव नूतन पोलीस अधीक्षक ‘अ‍ॅक्शन’मोडमध्ये : ऑल आऊट मोहिमेत 25 लाखांचा मुद्देमाल जप्त ; 195 आरोपींवर कारवाई

अवैध धंद्याविरोधात वॉश आऊट : 34 हरवलेल्या बालकांसह महिला कुटूंबाकडे


Jalgaon’s New Superintendent of Police in ‘Action’ Mode: Contraband Worth ₹25 Lakhs Seized in ‘All-Out’ Operation; Action Taken Against 195 Accused भुसावळ (29 एप्रिल 2026) : जळगावची धुरा नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी हाती घेताच धडक कारवाईला सुरूवात केली आहे. पहिल्याच दिवसापासून अवैध वाळू व धंद्याविरोधात उघडण्यात आलेल्या मोहिमेनंतर आता ऑल आऊट ऑपरेशन अंतर्गत अवैध धंद्यांसह गावठी हातभट्टीच्या दारुविरोधात पोलिसांनी मोहिम उघडत 136 केसेसच्या माध्यमातून 25 लाख 13 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नूतन अधीक्षकांच्या धडाकेबाज कारवाईचे सुज्ञ नागरिकांकडून स्वागत होत असून कारवाईत सातत्य राखण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

अशी झाली कारवाई
जुगाराच्या 57 केसेसद्वारे 57 आरोपींवर कारवाई करण्यात आली तर दोन केसेस आर्म अ‍ॅक्टच्या करण्यात आल्या. अंमली पदार्थ प्रतिबंधच्या 15 केसेस करण्यात आल्या. तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधाच्या 233 केसेसद्वारे 32 हजार 229 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. 34 हरवलेली बालके व महिला स्वगृही परतल्या तर बीएनएस 285 अंतर्गत 22 केसेस करण्यात आल्या. मोटार व्हेईकल अ‍ॅक्ट अंतर्गत 272 केसेसद्वारे दोन लाख 82 हजार 300 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला तसेच बुलेट सायलेन्सर व फॅन्सी नंबरप्लेटच्या 150 केसेसद्वारे एक लाख चार हजार शंभर रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

तलवारीसह चाकू जप्त
मुक्ताईनगर हद्दीत तलवार जप्त करण्यात आली तर जळगाव तालुका हद्दीत दोन धारदार चाकू जप्त करण्यात आले.

अवैध हातभट्टीवर धडाकेबाज कारवाई
जळगाव तालुका, भुसावळ तालुका, यावल, मुक्ताईनगर, पिंपळगाव, चोपडा ग्रामीण, सावदा, पाचोरा आदी नऊ ठाणे हद्दीत 136 केसेसद्वारे 25 लाख 13 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दहा तडीपार जाळ्यात
शांतता भंग करणार्‍या 122 इसमांवर कारवाई करण्यात आली तर संशयास्पद हालचाली वाटणार्‍या 11 जणांवर कारवाई करण्यात आली. हद्दीपारीचे उल्लंघण करणार्‍या दहा जणांवर कारवाई झाली तर 122/124 अंतर्गत सहा केसेस करण्यात आल्या.

टवाळखोरांसह रिल्स बनवणार्‍यांवर कारवाई
105 हॉटेल्ससह लॉज तपासण्यात आले तर शाळा, महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करणार्‍या 33 टवाळखोरांविरोधात कारवाई करण्यात आली व आक्षेपार्ह रिल्स बनवणार्‍या पाच जणांविरोधात कारवाई करण्यात आली.

असमाजिक घटकांवर कारवाई करणार : अधीक्षक
ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत फरार व पाहिजे असलेल्या आरोपींची पोलिसांनी तपासणी केली. 77 पैकी 33 आरोपी मिळून आले व जिल्हाभरात 29 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. यापुढेही अशाच अचानक पद्धत्तीने नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येईल. असमाजिक घटकांवर यापुढेही कठोर पद्धत्तीने कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ शी बोलताना म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !