धुळे-भुसावळ एस.टी.बसचा अपघात : चालक-वाहक गंभीर ; 15 प्रवासी किरकोळ जखमी


जळगाव (30 एप्रिल 2026) : धावत्या बसचे बस अचानक निकामी झाल्यानंतर अनियंत्रित झालेली बस रस्त्यालगतच्या सुरक्षा कठड्याला बस धडकली. या अपघातात चालक आणि वाहक दोघेही गंभीर जखमी झाले असून अन्य 15 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर धुळ्यात उपचार सुरू आहेत.

अचानक झाले ब्रेक निकामी
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे-भुसावळ एसटी बस पारोळा येथून सुटल्यानंतर एरंडोलजवळील धारागीर गावाजवळ आली असताना, बसच्या मागील बाजूने मोठा खळखळ आवाज येऊ लागला. काही क्षणांतच चालकाला समजले की, बसचे ब्रेक पूर्णपणे निकामी झाले आहेत. बस अनियंत्रीत झाल्याचे लक्षात येताच प्रवाशांमध्ये एकच आक्रोश आणि आरडाओरडा सुरू झाला. सुमारे तीन किलोमीटरपर्यंत ही बस कधी रस्त्यावर तर कधी रस्त्याखाली झिग-झॅग पद्धतीने धावत होती.

चाके निखळली, पण कठड्याने वाचवले
हा थरार सुरू असतानाच बसची काही चाके निखळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तांत्रिक बिघाड इतका भीषण होता की बस कधीही पलटी होऊ शकली असती मात्र चालकाने शर्थीचे प्रयत्न करत बस रस्त्यालगतच्या सुरक्षा कठड्यावर नेऊन धडकवली. या धडकेमुळे बस थांबली आणि 50 ते 60 प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले.

दरम्यान, एसटी महामंडळाच्या या ‘खटारा’ बसगाड्या प्रवाशांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप आता प्रवाशांकडून केला जात आहे. या तांत्रिक बिघाडाबाबत महामंडळ कोणती कारवाई करणार? याकडे लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !