दहा हजारांची लाच भोवली : साक्री पंचायत समिती कार्यालयात लाच स्वीकारणारा तांत्रिक सहाय्यक धुळे एसीबीच्या जाळ्यात
अडचणी वाढल्या : गटविकास अधिकार्यांचीदेखील होणार एसीबीकडून चौकशी
गणेश वाघ
Bribe of ₹10,000 Proves Costly: Technical Assistant Accepting Bribe at Sakri Panchayat Samiti Office Caught in Dhule ACB’s Net भुसावळ (30 एप्रिल 2026) : मोजमाप पुस्तिका तपासणीला शाखा अभियंता यांच्याकडे पाठवण्यासाठी तडजोडीअंती 10 हजारांची लाच मागून ती साक्री पंचायत समितीच्या कार्यालयातच स्वीकारतान तांत्रिक सहाय्यक धुळे एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. नितीन नारायण वारकर (52, बाहुबली नगर, साक्री रोड, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव असून गुरुवारी सायंकाळी हा सापळा यशस्वी करण्यात आला. या कारवाईने साक्री पंचायत समितीतील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे तर या कारवाईने साक्री गटविकास अधिकार्यांच्यादेखील अडचणी वाढल्या असून त्यांचीदेखील कसून चौकशी होणार असल्याचे ‘खास’ सूत्रांनी सांगितले.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराला राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत 2023-2024 मध्ये विहिर खोदण्यासाठी चार लाख रुपये मंजूर झाले व साक्री गटविकास अधिकार्यांनी 8 नोव्हेंबर 2023 रोजी कार्यारंभ आदेश दिला. तक्रारदाराच्या भावाने विहिरीचे काम सुरू केल्यानंतर त्यांना अनुदानाचे 15 हप्ते मिळाले मात्र उर्वरीत अनुदान मिळण्यासाठी तांत्रिक सहाय्यक नितीन वारकर यांनी 16 फेब्रुवारी 2016 रोजी विहिरीचे मोजमाप करून झालेल्या कामाच्या बदल्यात एक लाख 62 हजार 320 रुपयांची नोंद मूल्यांकनाच्या मोजमाप पुस्तिकेत केली.

लाच स्वीकारताच पडल्या बेड्या
तक्रारदाराने अनुदासाठी वारकर यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी मोजमाप पुस्तिका शाखा अभियंता यांच्याकडे पाठवण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली व गुरुवार, 30 रोजी तक्रारदाराने एसीबीडे येत तक्रार नोंदवली. लाच पडताळणीनंतर सापळा रचण्यात आला व आरोपीने लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्याने पथकाने त्याच्या मुसक्या बांधल्या.
यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सागर शिर्के, प्रीतेश चौधरी, चंद्रकांत सैंदाणे, कॉन्स्टेबल रेश्मा परदेशी, हवालदार सुधीर मोरे, कॉन्स्टेबल जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
