मुंबईतील ‘त्या’ चौघांच्या मृत्यूमागे विषबाधा व षडयंत्र असल्याचा संशय
Suspicion of Poisoning and Conspiracy Behind the Deaths of ‘Those’ Four in Mumbai मुंबई (1 मे 2026) : मुंबईत मध्यरात्री टरबूज खाल्ल्यानंतर एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू ओढवला होता तर या प्रकरणात आता नवा ट्वीस्ट समोर आला असून हा प्रकार विषबाधा वा षडयंत्राचा भाग असू शकतो, अशी शक्यता आहे. विशेष म्हणजे कुटूंब प्रमुख अब्दुल्ला यांच्या शरीरात मॉर्फिन आढळून आले असून याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे.
घातपाताचा यंत्रणेला संशय
मुंबईतील बिर्याणीनंतर टरबजू खाऊन मृत्यू चौघांचा मृत्यू झाला होता तर प्राथमिक न्यायवैद्यक चाचणीत मृतांच्या महत्त्वाच्या अंतर्गत अवयवांना हिरवट रंग आल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अब्दुल्ला दोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन दोकाडिया, मुलगी आएशा दोकाडिया व जैनब दोकाडिया यांचा बिर्याणी व त्यानंतर कलिंगड खाल्यामुळे मृत्यू झाला मात्र आता प्राथमिक न्यायवैद्यक चाचणीत मृतांच्या अंतर्गत अवयवांना हिरवट रंग आल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे या मृत्यूंविषयी तर्कवितर्क लढवले जात आहे.

शरीरा रासायनिक घटकांचा शिरकाव
सूत्रांच्या माहितीनुसार, शवविच्छेदनानंतर करण्यात आलेल्या न्यायवैद्यक तपासणीत मृतांचा मेंदू, हृदय व आतडी यांचा रंग हिरवट झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सामान्यतः साध्या अन्न विषबाधेत अशा प्रकारे अंतर्गत अवयवांचा रंग बदलत नाही. त्यामुळे हा प्रकार एखाद्या अत्यंत विषारी रासायनिक घटकांचा शरीरात शिरकाव झाल्यामुळे घडला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.
अब्दुल्ला दोकाडियांच्या शरीरात आढळले मॉर्फिन
धक्कादायक बाब म्हणजे मृत अब्दुल्ला यांच्या शरीरात मॉर्फिन आढळून आले आहे. मॉर्फिन हे एक अत्यंत शक्तिशाली वेदनाशामक औषध आहे. ते सामान्यतः शस्त्रक्रिया किंवा तीव्र कर्करोगाच्या वेदना कमी करण्यासाठी वैद्यकीय देखरेखीखाली वापरले जाते त्यामुळे अब्दुल्ला यांच्या शरीरात हे औषध कसे काय आले? याचा शोध आता पोलिस घेत आहेत. प्रारंभी हा प्रकार अन्नातून झालेल्या विषबाधेचा असावा असा अंदाज होता. पण न्यायवैद्यक चाचणीतील नवीन निरीक्षणे पाहता हा प्रकार अन्न विषबाधेपेक्षा पूर्णतः वेगळा असल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला जात आहे.
मृतांचे मोबाईल फोनही जप्त
पोलिसांनी मृतांचे मोबाईल फोनही जप्त केले असून या फोनद्वारे कुणी कुणाशी काही संशयास्पद संवाद केला होता का? याचा तपास पोलिस करत आहेत. याशिवाय कुटुंबप्रमुख अब्दुल्ला दोकाडिया यांच्या व्यावसायिक व्यवहारांबाबत आणि बँक व्यवहारांबाबतही तपास सुरू आहे.

