चार हजारांची लाच भोवली : चाळीसगावातील खाजगी पंटर धुळे एसीबीच्या जाळ्यात
दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांचा सुळसुळाट वाढल्याचा आरोप
Bribe of ₹4,000 Proves Costly : Private Middleman from Chalisgaon Caught in Dhule ACB’s Net धुळे (4 मे 2026) : चाळीसगावच्या दुय्यम निबंधक कार्यालयातील काम करून देण्यासाठी चार हजारांची लाच मागून तीन स्वीकारताना सुनील शिवदास निकम (47, आनंदवाडी, जुना मालेगाव रोड, चाळीसगाव) या खाजगी संशयीताला धुळे एसीबीने अटक केली आहे.
असे आहे लाच प्रकरण
पिलखोड, ता.चाळीसगाव येथील तक्रारदार 30 एप्रिल रोजी चाळीसगावच्या दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्यानंतर त्यांना खाजगी इसम सुनील निकम भेटले. यावेळी तक्रारदाराला सर्वे क्रमांक 4/1 व 4/2 पैकी प्लॉट क्रमांक 12 या बिनशेती प्लॉटचे खरेदीखत व सूची क्रमांक दोनची प्रमाणित नक्कल देण्यासाठी निकम याने नऊ हजारांची लाच मागणी करून पाच हजार रुपये घेतले व उर्वरीत चार रुपये नकला देताना द्यावे लागतील, असे सांगितले. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार दिली व सापळा रचण्यात आला.

सोमवारी सायंकाळी निकम यांना चार हजारांची लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सागर शिर्के, प्रीतेश चौधरी, चंद्रकांत सैंदाणे, रेशमा परदेशी, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.