हळदीच्या कार्यक्रमात कमरेला मिरवला कट्टा ; पाचोरा तालुक्यातील संशयीत कासोदा पोलिसांच्या जाळ्यात


Pistol Flaunted at Waist During ‘Haldi’ Ceremony ; Suspect from Pachora Taluka Nabbed by Kasoda Police जळगाव (6 मे 2026) : हळद समारंभाच्या कार्यक्रमात कमरेला गावठी कट्टा लावून मिरवणार्‍या पाचोरा तालुक्यातील तरुणाला कासोदा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडील गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

काय आहे प्रकरण ?
क्षषेेज्ञर्क्षें 3 मे 2026 रोजी ताडे (ता. एरंडोल) येथे एका हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी बाहेरगावाहून अनेक पाहुणे आले होते. रात्री 11फ30 वाजेच्या सुमारास बँडच्या तालावर नाचत असतानश्र लखन प्रकाश वाघ (रा. परधाडे, ता. पाचोरा) या तरुणाच्या कमरेला गावठी कट्टा लावलेला काही नागरिकांना दिसून आला. याबाबत उपस्थित लोकांनी विचारणा केली असता, गर्दीचा फायदा घेऊन लखन वाघ तिथून पसार झाला.



कासोदा पोलिसांनी आवळल्या मुसक्या
या घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस स्टेशनचे पथक सक्रिय झाले. मंगळवार, 5 मे 2026 रोजी पोलीस तपासात गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, संशयित आरोपी लखन वाघ हा पुन्हा गुन्हे करण्याच्या उद्देशाने ताडे गावात गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती एपीआय श्रीकांत पाटील यांना मिळताच पथकाने भातखेडे चौफुली येथे सापळा रचून लखन वाघ याला ताब्यात घेतले. आरोपीकडील एक गावठी कट्टा (पिस्तूल) आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले व गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी आवळल्या मुसक्या
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपअधीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक श्रीकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोलीस कर्मचारी निलेश गायकवाड, योगेश पाटील आणि सोनू पाचुंदे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !