जळगावात बोलण्यात गुंतवून ज्येष्ठांची फसवणूक : संशयीत स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
Elderly Duped in Jalgaon by Being Kept Engaged in Conversation: Suspect Nabbed by Local Crime Branch जळगाव (6 मे 2026) : जळगावात ज्येष्ठांना बोलण्यात गुंतवून त्यांना गंडवण्याचे प्रकार समोर आले होते. या प्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. अल्ताफ हसन मदारी (32) व मोहसीन जावेद मदारी (31, नगरदेवळा, ता.पाचोरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
असे आहे फसवणूक प्रकरण
20 एप्रिल 2026 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास गजानन विठोबा सप्रे ( 65, रा. जिल्हा बँक कॉलनी, जळगाव) हे बसस्थानक परिसरात उभे असताना एका इसमाने त्यांच्याशी शेगाव बसबाबत बोलत संवाद साधला. त्यानंतर त्याने आपल्या साथीदारासह फिर्यादीला बोलण्यात गुंतवून हातचलाखीने ‘शनीदोष काढून देतो’ असे सांगत त्यांची अंगठी व रोख रक्कम काढून घेतली आणि दोघेही पसार झाले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान आरोपी नगरदेवळा (ता.पाचोरा) येथील असल्याची माहिती समोर आली.
यानुसार पोलिसांनी सापळा रचून अल्ताफ हसन मदारी (32) आणि मोहसिन जावेद मदारी (31) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या आणखी एका साथीदाराचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या आरोपींना पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, अतुल वंजारी, विजय पाटील, अकरम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, किशोर पाटील, राहुल रगडे, रवींद्र कापडणे, प्रदीप सपकाळे, मिलिंद जाधव, गोविंद पाटील तसेच पाचोरा पोलीस ठाण्याचे दिनेश पाटील व जळगाव आरपीएफचे अंमलदार पंकज वाघ तसेच नेत्रमचे अंमलदार मुबारक देशमुख, पंकज खडसे, कुंदनसिंग बयास आदींच्या पथकाने केली.