जळगावातील घरफोडी प्रकरणी आंतरराज्यीय टोळी जाळ्यात : 11 लाखांचा मुद्देमाल जप्त


Inter-state Gang Busted in Jalgaon Burglary Case : Goods Worth ₹11 Lakh Seized जळगाव (6 मे 2026) : जळगावच्या एअरपोर्ट परिसरातील ‘तारा बिझनेस पार्क’ भागातील रुबी पेंट्स कंपनीतील धाडसी घरफोडीची एमआयडीसी पोलिसांनी उकल केली आहे. मध्य प्रदेशातील सेंधवा भागातील एका आंतरराज्य टोळीला या प्रकरणी अटक केल्यानंतर न 11 लाख पाच हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

12 लाखांच्या घरफोडीने उडाली होती खहबळ
फिर्यादी मोईज अब्बास बोहरा यांची एअरपोर्ट परिसरात रुबी पेंट्स नावाची कंपनी आहे. ते त्याच ठिकाणी वास्तव्यास आहेत. 13 एप्रिल 2026 रोजी बोहरा कुटुंबीय बाहेरगावी गेले असता, 15 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 12 लाख 13 हजार रुपयांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.



सहा जणांची टोळी जाळ्यात
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाची नियुक्ती केली. तपासादरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे ही टोळी मध्य प्रदेशातील सेंधवा तालुक्यातील दुर्गम भागात असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने मध्यप्रदेश गाठले. चाचरीया पाटी आणि खरगोन परिसरात पोलिसांनी वेशांतर करून आरोपींवर पाळत ठेवत सहा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या.

अटकेतील आरोपींमध्ये निलेश उर्फ भुर्‍या माहेरीया डुडवे (रा.धावडा), ताराचंद पठाण सोलंकी, सायसिंग राकेश सोलंकी, रवींद्र छोटू आर्य, दिलीप मंगा डुडवे, ग्यारशीलाल मगन अलावे (सर्व रा. चाचरीया पाटी, जि. बडवानी, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे.

11 लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपींकडून 39 ग्रॅम सोन्याचे दागिने व लगड (किंमत पाच लाख 47 हजार 50 रुपये), 99 ग्रॅम चांदीचे दागिने (किंमत 25 हजार रुपये) तसेच पाच लाख 78 हजारांची रोकड असा एकूण 11 लाख पाच हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, गिरीश पाटील, मोतीलाल बोरसे, विशाल कोळी, रमाकांत साळुंखे, शशिकांत मराठे, नितीन ठाकुर, राहुल घेटे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !