चुंचाळेत पाय घसरुन विहिरीत पडल्याने 16 वर्षीय बालकाचा मृत्यू


16-Year-Old Boy Dies After Slipping and Falling into a Well in Chunchale यावल (7 मे 2026) : यावल तालुक्यातील चुंचाळे येथे एका 16 वर्षीय मुलाचा गाव विहीरीत पाय घसरून तो पाण्यात बुडाला होता. ही घटना बुधवारी सांयकाळी घडली होती. रात्री उशीरा या मुलाचा मृतदेह काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयास सोपवला. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पाय घसरुन बुडाल्याने मृत्यू
चुंचाळे, ता.यावल या गावात गाव विहिरीजवळ न्याजोद्दीन तडवी (16) हा मुलगा खेळत होता व खेळत असतांना विहिरीत पाय घसरून तो कोसळला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. मुलगा विहिरीत कोसळल्याचे निदर्शनास आल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. विहिरीत शोध घेण्यासाठी डांभुर्णी येथील पोहणार्‍यांना बोलवण्यात आले.



रात्री उशिरा त्यास विहिरीतून मृतदेह काढून यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. येथे त्याच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !