जळगाव हादरले : मद्यपी पतीचा पत्नीनेच केला खून


Jalgaon Shaken: Wife Murders Alcoholic Husband जळगाव (7 मे 2026) : कर्जबाजारी व व्यसनाधीन पतीच्या त्रासाला कंटाळून संतप्त पत्नीनेच पतीचा गळा आवळून खून केला. ही धक्कादायक घटना जळगावात घडली. भारत पाटील (50) असे खून झालेल्या मयत पतीचे तर मनीषा भारत पाटील (45) असे आरोपी पत्नीचे नाव आहे.

काय घडले जळगावात ?
मयत भारत पाटील हा मद्यपानाच्या व्यसनाधीन होता तसेच तो कर्जबाजारी असल्याने घरातील आर्थिक परिस्थिती ढासळली होती. परिणामी, कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पत्नीवर येऊन पडली होती.



पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, पतीकडून होणार्‍या सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून आरोपीने रात्रीच्या सुमारास हे टोकाचे पाऊल उचलले. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पाठवला.

शवविच्छेदन अहवालानुसार, गळा आवळल्यामुळे श्वास गुदमरून भारत पाटील यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसांनी आरोपी मनीषा पाटील हिला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वात सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !