लग्नात वराचे बूट लपवल्यानंतर पैसे मागण्यावरुन राडा : वधू-वराकडील मंडळी थेट भिडली


Chaos Erupts at Wedding Over Demand for Money After Hiding Groom’s Shoes: Families of Bride and Groom Clash Directly अंबड (8 मे 2026) : लग्नामध्ये नवरदेवाचे बूट चोरण्याची आणि त्या बदल्यात मानपान किंवा पैसे मागण्याची परंपरा सर्वश्रृत आहे मात्र या प्रथेलाच अंबड तालुक्यात गालबोट लागले. चक्क वधू-वराकडील मंडळींनी एकमेकांना भिडल्याने मंगल कार्यालयात पळापळ झाली.

क्षणात बदलला माहोल
नांदी परिसरात एका विवाह सोहळ्याचे विधी उत्साहात सुरू होते. परंपरेनुसार, नवरीकडील मुलींनी नवरदेवाचे बूट लपवले. विधी संपल्यानंतर जेव्हा बूट परत करण्याची वेळ आली, तेव्हा त्या बदल्यात पैशांची मागणी करण्यात आली. यावेळी मानपानावरून आणि पैशांच्या आकड्यावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. सुरुवातीला थट्टा-मस्करी वाटणारा हा प्रकार काही वेळातच गंभीर वादात बदलला.



महिलांची ‘फ्री-स्टाईल’ हाणामारी
हा वाद इतका विकोपाला गेला की, पुरुष मंडळींसोबतच महिलांनीही एकमेकींना मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हायरल व्हिडिओमध्ये महिला एकमेकींचे केस धरून ओढताना आणि तुफान हाणामारी करताना दिसत आहेत. या गोंधळामुळे लग्नमंडपात उपस्थित असलेल्या लहान मुलांची आणि इतर पाहुण्यांची मोठी धांदल उडाली. स्वतः नवरदेवाने मध्यस्थी करून हा राडा थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त जमावापुढे त्याचेही काही चालले नाही. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्यात वर्‍हाडी एकमेकांना मारहाण करताना स्पष्ट दिसत आहेत.

पोलिसांची मध्यस्थी आणि कारवाई
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस स्टेशनचे पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूच्या वर्‍हाडींना शांत केले. या प्रकरणाबाबत माहिती देताना पोलिस निरीक्षक संतोष घोडके यांनी सांगितले की, दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, मात्र कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल.

सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार
धुमश्चक्रीचा फायदा घेत काही अज्ञात व्यक्तींनी हातसफाई केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. नवरदेवाकडील 7 ग्रॅम आणि 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने या गोंधळात चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. यामुळे नवरदेवाच्या कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !