मुक्ताईनगर हादरले : अल्पवयीनावर अत्याचार करीत अश्लील व्हिडिओ सोशल मिडीयावर केला व्हायरल ; पुण्यातील आरोपीला बेड्या
मुक्ताईनगर (8 मे 2026) : मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या 16 वर्षीय अल्पवयीनावर अत्याचार करीत तिचा अश्लील व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुण्यातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास पोलिसांनी अटक केली आहे.
अत्याचार करीत केला व्हिडिओ
संशयीत ईश्वर सिद्धार्थ वाघ (ह.मु. पुणे) याने पीडितेला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एवढ्यावरच न थांबता या नराधमाने पीडितेचा व्हिडिओ देखील तयार केला व 6 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आपल्या इन्स्टाग्राम आयडीवरून पीडितेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल केला. या प्रकारामुळे पीडितेच्या कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला. पीडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवार, 7 मे रोजी रात्री उशिरा मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.


आरोपीला पोलिसांकडून अटक
घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. आरोपीची माहिती मिळताच त्यास शुक्रवारी अटक करण्यात आली तर संशयीताला उद्या शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
