शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई : चंढीगडहून महाराष्ट्रात येणारी 44 लाखांची अवैध विदेशी दारू जप्त
Major Operation by Shirpur Taluka Police: Illegal Foreign Liquor Worth ₹44 Lakhs, En Route from Chandigarh to Maharashtra, Seized. शिरपूर (9 मे 2026) : केंद्रशासीत प्रदेश चंदीगड येथून अवैधरित्या एमपीमार्गे महाराष्ट्रात येणार्या तब्बल 44 लाखांचा अवैध मद्यसाठा शिरपूर तालुका पोलिसांनी पकडल्याने मद्य तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
7 मे 2026 रोजी रात्री शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना चंदीगडनिर्मित दारुची सेंधवा (मध्यप्रदेश) मार्गे धुळे दिशेने जाणार्या कंटेनर (आर.जे.32 जी.बी.4036) द्वारे अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर हाडाखेड चेकपोस्टजवळ सापळा रचण्यात आला. संशयित कंटेनर अडवून चालक सतीशकुमार पुडाराम जाट (रा.हरियाणा) ला ताब्यात घेतल्यानंतर त्याने समाधानकारक माहिती न दिल्याने पंचांसमक्ष कंटेनरची तपासणी केली असता त्यात अवैधरित्या दारुचा साठा आढळल्याने तो जप्त करण्यातत आला.


44 लाखांचा साठा जप्त
पोलिसांनी ऑल सिझन्स – 180 मिलीचे 160 खोके, ऑल सिझन्स 750 मिलीचे 50 खोक,े अंकल टॉम 750 मिलीचे 49 खोके, अंकल टॉम – 180 मिलीचे 100 खोके, रॉयल चॅलेंज 180 मिलीचे 07 खोके व 25 लाखांचा टाटा कंटेनर मिळून 44 लाख 63 हजार 800 रुपयांचा साठा जप्त केला. तपास मनोज कचरे करीत आहेत
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, मनोज कचरे, संतोष पाटील, संदीप ठाकरे, योगेश मोरे, विजय ढिवरे, स्वप्निल बांगर, सुनील पवार, अल्ताफ मिर्झा, गुरुदास बडगुजर आदींच्या पथकाने केली.
