कौटूंबिक वादातून सासर्यानेच सुनेचा डोक्यात दगड टाकून केला खून : पसार आरोपीला जळगावात पडल्या बेड्या
कौटूंबिक वादाचा करुण अंत : सहा महिन्यांचे बाळ पोरके : मेहरुण परिसरातून आवळल्या मुसक्या
Father-in-Law Murders Daughter-in-Law by Striking Her Head with a Stone Amidst Family Dispute; Absconding Accused Arrested in Jalgaon जळगाव (10 मे 2026) : सुनेसोबत सातत्याने होत असलेल्या वादातून संतापाच्या भरात सासर्यानेच सुनेचा डोक्यात दगड टाकून खून केला. ही धक्कादायक विद्येच्या माहेरघरात अर्थात पुण्यातील रायकर मळा परिसरात घडली. खुनानंतर सासरा जळगावात लपून असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर आरोपीला मेहरूण परिसरातून अटक करण्यात आली. भानुदास भास्कर चौधरी (पुणे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
असे आहे खून प्रकरण
2 मे 2026 रोजी पुण्यातील रायकर मळा भागात घरगुती वादातून भानुदास भास्कर चौधरी यांचा सून स्वाती तेजस चौधरी (28) सोबत वाद झाला. यावेळी सहा महिन्यांच्या बाळासोबत असलेल्या स्वातीच्या डोक्यात सासर्याने भला मोठा दगड घातला व ती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेली पाहून सासर्याने धूम ठोकली. खुनानंतर आरोपीने घराला बाहेरून कुलूप लावून पलायन केले. घरात लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजार्यांनी माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पुण्यातील नांदेड सिटी पोलिसात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला.


जळगावातून आवळल्या मुसक्या
पोलीस तपासात हा खून सासर्यानेच केल्याचे व तो जळगावातील मेहरुण भागातील महादेव मंदिर परिसरात लपून बसल्याची माहिती मिळताच पथकाने त्यास अटक केली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धीरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, अंमलदार अतुल वंजारी, विजय पाटील, अकरम शेख, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, राहुल रगडे, रवींद्र कापडणे, प्रदीप चौरे आदींच्या पथकाने केली.