नीट पेपरफुटी प्रकरण : लातूरमधील शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या जाळ्यात


NEET Paper Leak Case : Shivraj Motegaonkar from Latur Caught in CBI Net पुणे (18 मे 2026) : लातूरमधील प्रख्यात शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने तब्बल 11 तासांच्या चौकशीनंतर अटक केल्याने खळबळ उडाली आहे. शिवराज मोटेगावकर हे आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक आहेत. लातूर, पुण्यातल्या चौकशीनंतर मोटेगावकर सीबीआयने अटक केली.

तब्बल 11 तासांच्या चौकशीअंती कारवाई
रविवारी शिवराज मोटेगावकर यांची जवळपास 11 तास चौकशी सीबीआयच्या पथकाने केली, या चौकशीत काय निष्पन्न झालं हे जरी समोर आलं नसले तरी मात्र क्लास संचालकाची 11 तास चौकशी करून हे पथक दिल्लीला रवाना झाले होते. लातूर येथील प्राध्यापक एस.पी.कुलकर्णी या प्राध्यापकाची मास्टर माईंड म्हणून माहिती समोर आल्यानंतर सीबीआयचे पथक लातूरला दाखल झाले व त्यांनी एका प्रख्यात क्लास चालकाची 11 तास पासून चौकशी काल केली यामुळे लातूरच नव्हे तर राज्यभरात खाजगी नीट क्लास चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

मोटेगावकरांच्या अटकेने खळबळ
लातूर आणि पुणे येथील चौकशीनंतर शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. शिवराज मोटेगावकर हे लातूरमधील प्रसिद्ध ‘आरसीसी कोचिंग क्लासेस’चे संचालक आहेत. लातूरमधील पेपरफुटी प्रकरणाच्या धागेदोर्‍योनंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला. आता मोटेगावकर यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

शिवराज मोटेगावकर हे सीबीआयच्या ताब्यात आहेत, सीबीआयकडून तीन दिवसांपासून त्यांची चौकशी केली, आज त्यांना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे, त्यांची आधी 11 तास चौकशी करण्यात आली आहे. राज्यासह देशात त्यांच्या क्लासेसच्या शाखा आहेत, यामध्ये नांदेड कनेक्शन समोर आली आहे, मोटेगावकरांच्या क्लासचा यामध्ये काही संबंध आहे का याचा तपास केला जात आहे.

विद्यार्थी घरी परतले
नांदेडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसने सकाळीच विद्यार्थ्यांना घरी पाठवले असून सुट्या लागल्याचं कारण देत क्लासेसचे शटर बंद केले आहे. लातूरमध्ये झालेल्या चौकशीनंतर नांदेडच्या कोचिंग क्लासेसला सुट्टी देण्यात आली तर शहरातील कोचिंग क्लासेस येथे सकाळी विद्यार्थी आले त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना आजपासून सुट्या लागल्या असं कारण सांगत सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !