नीट पेपरफुटी प्रकरण : आरसीसी क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी

10 दिवस आधीच मिळवला होता पेपर ः टोळीतला सक्रिय सदस्य


NEET Paper Leak Case : RCC Classes’ Shivraj Motegaonkar Sent to 9-Day CBI Custody लातूर (18 मे 2026) : नीट पेपर फुटी प्रकरणात रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि नंतर वनस्पतिशास्त्र लेक्चरर मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आली. आता नीट परीक्षा घेणार्‍या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकार्‍याचाही सहभाग असल्याचे समोर येत असतानाच लातूरचे आरसीसीस क्लासेसेच प्रा.शिवराज मोटेगावकरला सीबीआयने अटक केली. आरोपीला न्यायालयाने नऊ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

कोचिंग सेंटरमार्फतच प्रश्नपत्रिकांचे वितरण
सुनावणीदरम्यान सीबीआय कोर्टात न्यायाधीश आणि तपास अधिकार्‍यांमध्ये झालेला संवाद महत्त्वाचा ठरला. न्यायाधीशांनी तपास अधिकारी पवन कौशिक यांना थेट प्रश्न विचारला की, मोटेगावकरकडेच प्रश्नपत्रिका आहेत, हे तुम्हाला कसं कळलं? या प्रश्नावर उत्तर देताना तपास अधिकारी कौशिक म्हणाले की, या प्रकरणातील संशयित निवृत्त प्राध्यापक कुलकर्णी हा शिवराज मोटेगावकरच्या सतत संपर्कात होता., त्याद्वारे ही बाब समोर आली आहे. येथील कोचिंग सेंटरमार्फतच प्रश्नपत्रिकांचे वितरण सुरू होते.

कागदपत्रे, इलेक्ट्रोनिक गॅझेट ताब्यात
नीट पेपरफुटी प्रकरण केवळ राजयपूर्तेच मर्यादेत न राहता देशभरातील मोठे रॅकेट असल्याचे समोर आले आहे. यात अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात प्राध्यापकांचा देखील समावेश आहे. यापूर्वी दोन प्राध्यापकांना सीबीआयने अटक केली होती. आता शिवराज मोटेगावकर यांना देखील अटक करण्यात आली आहे. कारण मोटेगावकर यांचे राज्यभरात नीट परीक्षेसंदर्भात मोठे क्लासेस आहेत. गेल्याच आठवड्यात मोटेगावकर यांचे ज्या ज्या ठिकाणी क्लासेस आहेत त्या ठिकाणी छापेमारी केली होती. यावेळी काही महत्त्वाची कागदपत्रे आणि काही इलेक्ट्रोनिक गॅझेट देखील सीबीआयने ताब्यात घेतली होती.

परीक्षेच्या 10 दिवस आधीच नीटची प्रश्नपत्रिका
चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, देशभरात 3 मे रोजी नीटची परीक्षा होती. परीक्षेच्या 10 दिवस आधीच म्हणजे 23 एप्रिल रोजीच शिवराज मोटेगावकरने नीटची प्रश्नपत्रिका मिळवली होती. चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच नीटची प्रश्नपत्रिका आणि उत्तपत्रिका मिळाल्याचे समोर आले. शिवराज मोटेगावकरने विवेक पाटील नावाच्या एका व्यक्तीला तसेच विद्यार्थ्यांना नीटची प्रश्नपत्रिका पाठवली होती, मात्र तपास यंत्रणेसमोर तो सध्या लाभार्थी विद्यार्थ्यांची नावे सांगण्यास टाळाटाळ करत आहे. इतकेच नव्हे तर, स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने परीक्षा संपल्यानंतर या प्रश्नपत्रिकेचे सर्व तांत्रिक पुरावे देखील नष्ट केले असल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, हा डेटा तपास यंत्रणांनी रिकव्हर केल्याचे समजते. त्यामुळेच मोटेगावकर गोत्यात आला आहे.

मनीषा मांढरेला 14 दिवसांची कोठडी
बॉटनी शिक्षिका मनीषा मांढरेला 14 दिवसांच्या कोठडीत पाठवले आहे. पुण्यातील बायोलॉजी लेक्चरर मनीषा गुरुनाथला दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. एजन्सीचा दावा आहे की मांढरे नीटच्या पेपर सेटिंग कमिटीचा भाग होती. मांढरेला माहीत होते की परीक्षेत कोणते प्रश्न येतील. तिने परीक्षेपूर्वी पुण्यात विशेष कोचिंग क्लास चालवला. तिथे तिने विद्यार्थ्यांना बॉटनी आणि झूलॉजीचे प्रश्न लिहून दिले होते. तपासात हे देखील समोर आले आहे की, मांढरेने पुण्याहून अटक करण्यात आलेल्या ब्युटिशियन मनीषा वाघमारेच्या माध्यमातून नीट देणार्‍या विद्यार्थ्यांना तिच्या कोचिंगमध्ये प्रवेश मिळवून दिला होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !