खंडव्यातील महिलेची रेल्वे प्रवासात साडेतीन लाखांचा ऐवज असलेली बॅग लंपास


रावेर (19 मे 2026) : रेल्वे प्रवासादरम्यान महिलेच्या बॅगेतील तब्बल साडेतीन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केले. हा प्रकार रावेर येथे उघडकीस आला.

प्रवासात दागिण्यांची चोरी
मिळालेल्या माहितीनुसार, आरती चव्हाण (36, रा. छनेरा, जिल्हा खंडवा) या 16 मे रोजी रेल्वेने प्रवास करून रावेर रेल्वे स्थानकावर उतरल्या होत्या. त्यानंतर त्या रावेर शहरातील बसस्थानकावर आल्या आणि तेथून आपल्या घरी गेल्या. प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेची चैन उघडून बॅग फाडली आणि त्यामधील एक लाख 45 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.




घरी पोहोचल्यानंतर बॅग फाटलेली असल्याचे आणि त्यातील ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात येताच आरती चव्हाण यांनी तत्काळ भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. प्राथमिक तपासानंतर संबंधित प्रकरण रावेर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आले असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या घटनेमुळे रेल्वे आणि सार्वजनिक प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी आणि प्रवासादरम्यान चोरटे सक्रिय झाल्याचे दिसून येत असून प्रवाशांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रवास मार्ग आणि संशयित हालचालींची माहिती तपासली जात असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पथके कार्यरत करण्यात आली आहेत.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !