नियंत्रण सुटल्याने भीषण अपघातात दोघे ठार
Two Killed in Horrific Accident After Losing Control मुंबई (20 मे 2026) : पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात घडल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. घटनास्थळी आयआरबी यंत्रणा, पोलीस व ऍम्ब्युलन्स दाखल झाली. मुंबईकडून पुण्याकडे येणार्या लेनवर कामशेत हद्दीत हा अपघात घडला.
डिव्हायडरचा पत्रा थेट गाडीत घुसल्याने दोघे जागीच ठार
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे मुंबई एक्सप्रेसवे वर अपघात झालेल्या गाडीमध्ये एकूण तीन जण होते. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी डिव्हायडरला जाऊन धडकली. डिव्हायडरचा पत्रा हा थेट गाडीमध्ये घुसल्याने गाडीत असलेले दोघे जागीच ठार झाले.









