गोंडगाव विद्यालयाने राखली निकालाची परंपरा : दहावीतील गुणवंतांचा गौरव
भडगाव (23 मे 2026) : भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील माध्यमिक विद्यालयाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा एकूण निकाल तब्बल ८३.०१ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.
यामध्ये कु. सायना जितेंद्र पाटील हिने ८६.८० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. तर कु. नंदिनी रविंद्र पाटील हिने ८४.६० टक्के गुणांसह द्वितीय, कु. नेहा अशोक पाटील हिने ८३.४० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. तसेच कु. योगिता दारासिंग परदेशी हिने ८१.६० टक्के गुणांसह चतुर्थ, तर चि. सौरव विजय पाटील याने ७८.८० टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक प्राप्त केला.




विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रा. स. शि. प्र. मंडळ, चाळीसगाव संस्थेचे चेअरमन डॉ. विनायक चव्हाण, सचिव प्राचार्य बाळासाहेब चव्हाण तसेच संचालक मंडळाने समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. जी. ननावरे यांनी विद्यार्थ्यांच्या जिद्द, मेहनत आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले. या यशामागे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालक सभेचे उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, दारासिंग परदेशी, एस. वाय. पाटील, व्ही. ए. पाटील, एस. आर. महाजन, पी. जे. देशमुख, ए. एम. परदेशी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







