अल्पवयीनाशी विवाहानंतर पीडीता गर्भवती : पतीविरोधात गुन्हा
जळगाव (शनिवार, 26 सप्टेंबर 2026) : अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये संशयीत आरोपी व पती भूषण अशोक मोरेविरोधात दाखल करण्यात आला.
काय आहे प्रकरण ?
पीडीता 17 वर्षांची असून जळगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. अल्पवयीन मुलगी असतानाही तिचा विवाह भूषण मोरे याच्यासोबत लावण्यात आला. पतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने पीडीता गर्भवती राहिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या नोंदीनुसार, बदनापूर पोलीस ठाणे, जि. जालना येथून प्राप्त माहितीनंतर संबंधित तक्रारीच्या आधारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक राजश्री पाटील करीत आहेत.