यावल शहरात बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने महिलेचा मृत्यू
यावल (27 मे 2026) : यावल शहरातील विस्तारित भागात तडवी वाड्यात पाण्याच्या टाकी जवळील रहिवाशी एका महिलेचा घरात बाथरूममध्ये पाय घसरून मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आशा कादर तडवी (57) असे मृताचे नाव आहे.
काय आहे प्रकरण ?
यावल शहरात फैजपूर रस्त्यावर विस्तारित भागातील तडवी वाडा भागात पाण्याच्या टाकीच्या जवळ आशा कादर तडवी (57) या महिला आपल्या घरी बाथरूममध्ये जात असताना त्यांचा पाय घसरला त्यात त्या जमिनीवर कोसळून गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. ही घटना सोमवारी घडली. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार निलेश चौधरी करीत आहे.

