घरगुती सिलिंडरचे दर दुसर्यांदा वाढले ; जनता महागाईने त्रस्त
Domestic LPG cylinder prices hiked for the second time; public burdened by inflation मुंबई (7 जून 2026) : तीन महिन्यांत दुसर्यांदा एलपीजीच्या किंमती वाढवण्यात आल्याने सर्वसामान्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. आधीच इंधन दराने महागाईचा भडका उडाल्यानंतर आता एलपीजी सिलिंडरचे दर वाढवून जखमेवर मीठ टाकण्याचा प्रकार करण्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, 7 मार्च रोजी एलपीजी सिलिंडरचे दर 60 ने वाढवण्यात आले व आता पुन्हा दर 29 रुपयांनी वाढवण्यात आल्याने एकूण तीन महिन्यात घरगुती सिलिंडर 89 रुपयांनी महागला आहे.
खर्चामुळे किंमती वाढवणे आवश्यक
न्यूज एजन्सी पीटीआयच्या सूत्रांनुसार, तेल कंपन्यांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या ऊर्जा खर्चांमुळे आणि घरगुती विक्रीवरील नुकसानीमुळे किमती वाढवाव्या लागल्या आहेत.
कंपन्यांना प्रति सिलेंडर 703 तोट्याचा दावा
न्यूज एजन्सी पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, सरकारी तेल कंपन्यांना प्रत्येक घरगुती सिलिंडरवर सुमारे 703 चे नुकसान होत होते. किंमती वाढूनही केवळ अंशतः भरपाई होईल.
2026 पूर्वी सरकारने 8 एप्रिल 2025 रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 ची वाढ केली होती. 1 मार्च 2026 रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर 31 पर्यंत वाढवण्यात आले होते.
5 किलोग्राम वजनाच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही 11 ची वाढ करण्यात आली होती, ज्यामुळे त्याची किंमत 821.50 झाली.
एलपीजीपूर्वी पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे दरही वाढले
गेल्या काही आठवड्यांत पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे दरही वाढले आहेत. मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एकूण 7.50 प्रति लिटरने वाढल्या आहेत, तर सीएनजी सुमारे 6 प्रति किलोने महाग झाली आहे. कंपन्यांना पेट्रोलवर सुमारे 11 प्रति लिटर आणि डिझेलवर 33.6 प्रति लिटरचे नुकसान होत आहे.
याउपरही कंपन्यांचा दावा आहे की पेट्रोल-डिझेल अजूनही उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमतीत विकले जात आहे. सरकारचे म्हणणे आहे की, जागतिक किमतींमध्ये झालेल्या संपूर्ण वाढीचा भार ग्राहकांवर टाकण्यात आलेला नाही. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतीचा काही भार सरकारी तेल कंपन्या स्वतः उचलत आहेत.



