पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेले किनगावातील ग्रामीण रुग्णालय सुरू होण्यासाठी मोर्चा


यावल (8 जून 2026) : श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समिती, किनगाव यांच्या वतीने किनगावातील श्रीराम मंदिर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकमार्गे ग्रामीण रुग्णालय किनगाव येथे शांततेत मोर्चा काढण्यात आला. लहान थोर, महिला पुरुष यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. किनगावातील ग्रामीण रुग्णालय सुरू होण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

पंतप्रधानांनी केले उद्घाटन
किनगाव गावातील ग्रामीण रुग्णालयाचे उदघाट्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ऑनलाईन प्रणाली द्वारे 2024 या वर्षी करण्यात आले होते, परंतु दोन वर्ष उलटून सुद्धा अजून पर्यंत दवाखान्यात यंत्र सामग्री नाही, स्टाफ नाही, रुग्णवाहिका नाही तर समितीने पाठपुरावा करत असताना कोणत्याही प्रकारचे समाधान न झाल्याने शेवटी मोर्चा काढण्यात आला.

चोपडा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सुद्धा शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. महिनाभरात दवाखाना सुरू होईल, असे आश्वासन डॉ.मनोज पाटील यांनी दिले.

निवेदन देण्यासाठी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि सर्व सभासद तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सभासद व कर्मचारी आणि गावातील सर लहान थोर, महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !