शेगावातील प्रसिद्ध कचोरी सेंटरवर एफडीएचा छापा


बुलढाणा (12 जून 2026) : शेगाव येथील प्रसिद्ध कचोरी सेंटरवर बुलढाणा अन्न आणि औषध प्रशासनाने छापा टाकल्याची माहिती आहे. कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या कच्च्या मालाचे नमुने अन्न आणि औषध प्रशासनाने घेतले आहेत. भेसळ युक्त पदार्थ आढळल्यास अन्न आणि औषध प्रशासन निश्चितपणे कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कारवाईने उडाली खळबळ
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशाने राज्यभर भेसळयुक्त खाद्यपदार्थांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार शेगाव येथील कचोरी ही प्रसिद्ध आहे व शेगाव येथे आल्यानंतर लाखो भाविक ही कचोरी खातात. मात्र ही कचोरी कशी बनवल्या जाते, त्यासाठी कोणता कच्चामाल वापरला जातो? हे तपासण्यासाठी गुरुवारी सायंकाळी अचानक अन्न व औषधी प्रशासनाचे निरीक्षक गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वात अचानक छापा टाकून कचोरी बनवण्यासाठीचे साहित्य व त्याचे नमुने घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !