वाहनधारकांनो लक्ष द्या : भुसावळ-फैजपूर मार्ग 17 जूनपासून महिनाभर बंद

अवजड आणि हलकी वाहतूक दोन वेगवेगळ्या पर्यायी मार्गाने वळवणार


Motorists, take note : Bhusawal-Faizpur road to remain closed for a month starting June 17 भुसावळ (14 जून 2026) : आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्र ग्रीन ग्रोथ प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या राज्यसीमा-भुसावळ-जामनेर-फैजपूर-मोटाळा-तळवाडी फाटा या राज्य मार्गाच्या कामामुळे भुसावळ-फैजपूर मार्गावरील वाहतुकीत तात्पुरता बदल केला आहे. या अंतर्गत भुसावळ ते फैजपूर रस्ता 17 जून ते 16 जुलैपर्यंत महिनाभर वाहतुकीसाठी बंद राहील. परिणामी वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काढले आदेश
मुंबई पोलीस कायदा कलम 33 (1) (बी) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी हे आदेश काढले आहेत. फैजपूर ते भुसावळ रस्त्याचे काम सुरू असल्याने अपघात टाळणे, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी हा वाहतूक बदल केला आहे. संबंधित पोलिस ठाणे, वाहतूक शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग आदेशाची अंमलबजावणी करेल.



मुख्य मार्ग होणार बंद : बसेसचे भाडे वाढणार !
फैजपूर-भुसावळला जोडणारा मुख्य मार्ग बंद होणार असल्याने बर्‍हाणपूर, रावेरकडून येणार्‍या व भुसावळातून या भागात जाणार्‍या बससेवेला फटका बसू शकतो. प्राथमिक माहितीनुसार बसेस फेर्‍याने धावतील यामुळे तात्पुरत्या भाडेवाढीची शक्यता आहे. परिवहन महामंडळ सर्वेक्षण करून हा निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !