भुसावळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नारायण नगरात वृक्षारोपण


भुसावळ (15 जून 2026) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नारायण नगरात कडूनिंब, वड इत्यादी झाडे लावण्यात आले. वाढदिवसानिमित्त शहरात कुठेही शुभेच्छांचे बॅनर्स, होर्डिंग्ज न लावता, त्याऐवजी निसर्गाचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला.

केवळ झाडे लावणे औपचारिकता न राहता, ती झाडे पुढे जगतील आणि त्यांची योग्य निगा राखली जाईल, असा संकल्प यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी केला. बदलत्या हवामानाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे ही काळाची गरज आहे.

वृक्षारोपण करतेवेळी जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक, शहराध्यक्ष दीपक सोनवणे, तालुका सचिव विलास कोळी, सुशील मोरे, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रणय भागवत, ज्ञानेश पाटील, रोशन बोरनारे इत्यादी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !