यावल शहराच्या स्वच्छतेची तडजोड नाही : नगराध्यक्ष छाया पाटील

यावल नगरपालिकेत स्वच्छता कर्मचार्‍यांच्या बैठकी दिल्या सक्त सूचना


यावल (15 जून 2026) : यावल नगरपालिकेच्या स्वच्छता कमगारांनी आपल्याला ठरवून दिलेल्या भागात सक्षमपणे स्वच्छता करावी, झाडू मारल्यानंतर तो कचरा गटारी टाकू नये, रजा न घेता कर्मचारी कोणीही गैरहजर राहू नये तसेच गैरहजर झालेले राहिलेल्या कर्मचार्‍यांना तत्काळ कारणे नोटीस बजावण्यात यावी, अशा सूचना नगराध्यक्ष छाया पाटील व नगरसेवक अतुल पाटील यांनी केल्या. ते यावल नगरपरिषदेमध्ये मंगळवारी स्वच्छता कर्मचार्‍यांच्या बैठकीत बोलत होत्या. शहरात स्वच्छते संदर्भात तडजोड केली जाणार नाही, प्रत्येकाने आपल्याला नेमून दिलेले काम वेळेत करावे, अशा सूचना प्रसंगी करण्यात आल्या.

गैरहजर राहणार्‍या कर्मचार्‍यांवर होणार कारवाई
यावल नगरपरिषदेच्या सभागृहात मंगळवारी यावलच्या नगराध्यक्ष छायाताई पाटील व नगरसेवक अतुल पाटील यांनी स्वच्छता कर्मचार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये शहराच्या स्वच्छते संदर्भात कुठल्याच प्रकारचे तडजोड केली जाणार नाही, प्रत्येक कर्मचार्‍यांनी त्याला नेमून दिलेल्या भागात सक्षमपणे स्वच्छता करावी, रस्ता झाडत असताना घाण कचरा गटारीत टाकू नये, एका ठिकाणी जमा करून ठेवा व त्याची उचल नगरपालिकेच्या वतीने केली जावी अशा सक्त सूचना त्यांनी केल्या. त्याचप्रमाणे नगरपालिकेत जे काही स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांनी आपल्याला नेमून दिलेल्या भागात काम करावे व कोणीतरी गैरहजर असले तर त्याने त्या गैरहजेरीचा अर्ज द्यावा, विना अर्ज गैरहजर राहणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.



यांची होती उपस्थिती
या बैठकीमध्ये नगरपालिकेचे कक्ष अधीक्षक विशाल काळे, स्वच्छता विभागाचे संभाजी कोल्हे, स्नेहा राजाने, उमर कच्छी, रवी काटकर सह आदींची उपस्थिती होती. तसेच याप्रसंगी शहरात प्लास्टिक वापर पुन्हा वाढलेला दिसत असल्याने नगरपालिकेच्या वतीने बुधवारपासून शहरात सक्षमपणे प्लास्टिक बंदी विरुद्ध मोहीम राबवण्याच्या सूचना प्रसंगी नगराध्यक्ष यांनी केल्या. जो कोणी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करत असेल त्याला पाच हजार रुपये दंड आकारावा अशा सक्त सूचना करण्यात आल्या आहे.

शरहर प्लास्टीक मुक्तीचा निर्धार
शहर प्लास्टिक मुक्त झाले पाहिजे व नागरिकांनी देखील सदर शहर आपले आहे आणि शहरात आपणच प्लास्टिक वापर ला विरोध केला पाहिजे, असेदेखील नागरिकांना आवाहन याप्रसंगी करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांनी त्यांना येणार्‍या अडीअडचणी, त्याचप्रमाणे नगरपालिकेकडून आवश्यक साधनसामग्री मिळावी याची देखील मागणी केली. आचारसंहितेनंतर कर्मचार्‍यांच्या मागणीनुसार त्यांना साधनसामग्री देखील पुरवली जाईल, असे आश्वासन नगराध्यक्ष यांनी दिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !