वरणगाव बसस्थानकासाठी अल्प जागा हवी : नगराध्यक्ष सुनील कळे

शेतकी संघ सभापती ज्ञानदेव झोपेंना साकडे : नकार दिल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेची मागणी करणार


वरणगाव (17 जून 2026) : वरणगाव शहरात बसस्थानक नसल्याने प्रवाशांना विद्यार्थ्यांना उन्हाळा, हिवाळा व पावसाळ्यात उघड्यावर बसची वाट पाहण्यासाठी तास न् तास उभे राहावे लागते. वरणगाव शहराच्या अवती-भोवती 28 खेडे लागून असल्याने ग्रामस्थ हे बाजारपेठ, महसूलकामी वरणगावात येतात मात्र असंख्य बसेस या बायपास झाल्याने वरणगाव शहरात येत नाहीत. या बसेस शहरात याव्यात यासाठी शेतकी संघाने काही जागा द्यावी, वरणगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी शेतकी संघ ज्ञानदेव झोपे, सचिव विजय झोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी शहराध्यक्ष सुनील माळी, युवा अध्यक्ष आकाश निमकर, विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक नानाभाऊ चौधरी, नगरसेवक इरफानभाई खाटीक, जनसेवक कुंदन माळी, तेजस कुमार जैन, फझलभाई शेख, भोजराज पालवे, मिलिंद भैसे, कामगार नेते मिलिंद मेढे, हितेश चौधरी, योगेश महाजन, रमेश पालवे, अनिल बंजारी आदींची उपस्थिती होती.

तर कृउबा जागेची मागणी करणार
शेतकी संघाची जागा बसस्थानकाला उपलब्ध न झाल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा ही बसस्थानकासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेली जागा असल्याने ती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !