विधानपरिषद निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अनिल चौधरींची माघार : नंदकिशोर महाजनांचा विजयाचा मार्ग सुकर !
Anil Chaudhary withdraws on the eve of the Legislative Council election; path to victory cleared for Nandkishor Mahajan! जळगाव (17 जून 2026) : विधानपरिषद निवडणूक चुरशीच्या वळणावर आली असतानाच भुसावळचे अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला रिंगणातून उमेदवारी मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. पक्ष श्रेष्ठी आमदार बच्चूभाऊ कडू व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करीत ही माघार घेत असल्याची चौधरींनी जाहीर केले आहे. चौधरींच्या माघारीमुळे महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.
ऐनवेळी माघारीची जिल्हाभरात चर्चा
जळगाव महापालिका निवडणूक यंदा मोठी चुरशीची होईल ही शक्यता होती मात्र शिवसेनेच्या नगरसेविका रेश्मा कुंदन काळे यांनी माघार घेतल्यानंतर निवडणूक त्रिशंकू लढत होईल हे स्पष्ट होते. निवडणूक रिंगणात केवळ महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन, महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे, अपक्ष अनिल चौधरी हेच उमेदवार उरले होते. चौधरी यांनी जिल्हाभरात नगरसेवकांच्या भेटी-गाठी घेत आपलाच विजय होणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला होता मात्र निवडणुकीच्या पूर्व संध्येला अनिल चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत माघारीची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
पक्ष श्रेष्ठींचे आदेश मानत माघार
जळगावा बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत अनिल चौधरी यांनी आपल्याला आमदार बच्चूभाऊ कडू आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दूरध्वनी आले व त्यांनी महायुतीसोबत असल्याने माघार घेण्याचे सुचविले. यानुसार आपण माघार घेत असल्याचे त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. यावेळी आमदार किशोरआप्पा पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
नंदूभाऊंचा विजयाचा मार्ग सुकर
अनिल चौधरी यांच्या माघारीमुळे आता रिंगणात नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे शरद तायडे असून नंदूभाऊ महाजन यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.




