ऑपरेशन टायगर : शिवसेनेसोबत सहा खासदार नसल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेला ठाम विश्वास


Operation Tiger: Thackeray’s Shiv Sena firmly believes that the six MPs are not with the Shiv Sena. मुंबई (18 जून 2026) : राज्यातील राजकीय घडामोडीनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत सहा खासदार नसल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेला ठाम विश्वास आहे त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार अरविंद सावंत यांनी व्हीप जारी करून आपल्या संसदीय पक्षाची बैठक बोलावली आहे. दरम्यान, ऑपरेशन टायगरवरून अरविंद सावंत यांनी आमच्या खासदारांवर पूर्ण विश्वास असल्याचं सांगितले असून ऑपरेशन टायगर यशस्वी झाले असेल तर चेहरे दाखवा, अशी मागणीही अरविंद सावंत यांनी केली आहे.

सहापैकी दोन खासदारांची आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत
उंबरठ्यावरच्या सहापैकी दोन खासदारांची आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत त्यामुळे त्यांनी स्वाक्षरी केलेली नसल्याचा दावा करण्यात येत आहे. हे दोन खासदार आजच्या बैठकीला निश्चित येतील, असा ठाकरेंच्या शिवसेनेला विश्वास आहे पण ठाकरेंच्या शिवसेनेकडे त्यांचे सर्वच्या सर्व लोकसभा खासदारसोबत असल्याची अधिकृत माहिती नाही पण त्याचवेळी शिंदेंच्या शिवसेनेकडून उंबरठ्यावरच्या सहा खासदारांच्या स्वाक्षरी अधिकृत ठरल्यायत किंवा ओम बिर्ला यांना सहा खासदारांच्या स्वाक्षरीचे पत्र देण्यात आले याबाबत अजूनही अधिकृत माहिती किंवा फोटो समोर आलेला नाही. आपल्या खासदारांविरोधात कोणत्याही प्रतिक्रिया देऊ नका, अशा सूचना ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपल्या नेत्यांना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.



ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची बैठक, खासदारांना व्हीप जारी
ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज संसदीय दलाची बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठकच खासदारांच्या एकनिष्ठतेची लिटमस टेस्ट ठरणार आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीत ही बैठक होत आहे. शिंदेंसोबत सहा खासदार नसल्याचा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. आजच्या बैठकीत किती खासदार आणि कोणते खासदार येतात यानंतरच ठाकरेंच्या शिवसेनेची पुढील भूमिका ठरणार आहे. सहापैकी दोन खासदारांनी आपली आश्वासन पूर्ण झाली नाहीत त्यामुळे सहीच केली नसल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येत आहे त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झालं की नाही? हे दोन्ही गटाकडून अद्याप अधिकृतरित्या समोर आलेले नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !