वैष्णवी संजय जाधव यांना ‘मान्सून शो पुरस्कार 2026’ प्रदान


मुंबई (20 जून 2026) : शासकीय कला व रचना महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील उद्योन्मुख तरुण कलाकार वैष्णवी संजय जाधव यांना मान्सून शो पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला आहे.

हा पुरस्कार त्यांच्या कलात्मक प्रतिभा, सर्जनशीलता आणि समर्पित कलाप्रवासासाठी देण्यात आला असून, त्यांच्या -षींशी इश्रेेा या कलाकृतीतून मानवी भावना, अनुभव आणि निसर्गातील बदल यांचे संवेदनशील चित्रण दिसून येते.




हा पुरस्कार जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील काळखेड़ा (खालखेड़ा) गावातील शेतकरी कुटुंबातील कष्टकरी बहिणी दुर्पताबाई आणि भगरताबाई यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करण्यात आला आहे. हा सन्मान नातू जितेंद्र सुरळकर (पिसूर्वो) यांच्या वतीने समर्पित करण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले.

पुरस्कार स्वरूप 25 हजारांची रोख रक्कम प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमात जहांगीर आर्ट गॅलरीच्या ज्येष्ठ कलासचिव श्रीमती के. जी. मेनन यांच्या कला क्षेत्रातील दीर्घकालीन योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला. त्यांनी कला विद्यार्थी व कलाकारांना दिलेले मार्गदर्शन आणि प्रोत्साहन समकालीन भारतीय कलेच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरल्याचे नमूद करण्यात आले.

कार्यक्रमात असेही अधोरेखित करण्यात आले की, प्रत्येक कलाकारामागे संघर्ष, त्याग आणि जिद्दीची प्रेरणादायी कहाणी असते. या पुरस्काराद्वारे त्या सर्जनशील प्रवासाला मान्यता देण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !