मंत्री गिरीष महाजनांची सोशल मिडीयातून बदनामी : वरणगावात समर्थकांचा मोर्चा
वरणगाव पोलिसांना निवेदन : सूत्रधाराचा शोध घेवून कारवाईची मागणी
Minister Girish Mahajan Defamed on Social Media : Supporters’ Rally in Varangaon वरणगाव (20 जून 2026) : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीषभाऊ महाजनांची महिलेचा फोटो जोडून सोशल मीडियावर खोटी व दिशाभूल करणारी छायाचित्रे प्रसारित करून बदनामी केल्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी वरणगावात महाजन समर्थकांनी मोर्चा काढला. लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चानंतर वरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस सहा.निरीक्षक अमित कुमार बागुल यांना निवेदन देण्यात आले.
खोटी छायाचित्रे प्रसारीत करून बदनामी
यावेळी बोलताना सुनील काळे म्हणाले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटी छायाचित्रे प्रसारित करून मंत्री गिरीष महाजन यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून समाजात त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा कट रचला गेला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी.



योग्य ती कारवाईचे आश्वासन
निवेदन स्वीकारल्यानंतर पोलीस सहा.निरीक्षक अमित कुमार बागुल यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई न झाल्यास महाजन समर्थकांच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिला.
यांची होती उपस्थिती
यावेळी शहराध्यक्ष सुनील माळी, तालुकाध्यक्ष शामराव धनगर, जनसेवक मिलिंद भाईसे, कुंदन माळी, तेजस जैन, युवा अध्यक्ष आकाश निमकर, अन्सारी, रमेश पालवे, फझल भाई, अजमल भाई, हितेश चौधरी, कमलाकर मराठे, राहुल वंजारी, गणेश चौधरी, बळीराम सोनवणे, नामदेव मोरे, दत्तात्रय सूर्यवंशी, शालिग्राम पैसे, आयुब खान, निजाम मामू, दुर्गेश राजपूत, मयूर शेळके, जगन कोळी, साबीर कुरेशी, अरुण बावणे, छोटू सेवतकर, के.जी.अमृते, डॉ.सादिक शेख, पंकज चौधरी, संदीप माळी, नदीम शेख, मुन्ना लपलीकर, राहुल जंजाळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

