भुसावळात भाजपातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
भुसावळ (21 जून 2026) : भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर उत्तर व दक्षिण विभागातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा शैलजा पुरुषोत्तम नारखेडे, भाजप भुसावळ शहर उत्तर विभागाचे शहराध्यक्ष संदीप सुरवाडे तसेच दक्षिण विभागाचे शहराध्यक्ष किरण कोलते यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
योगाने आरोग्य राहील सुदृढ
योगशिक्षक वसंत बळेल तसेच योग सहाय्यक स्वरूपा चौधरी यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व पटवून दिले. विविध योगासने, प्राणायाम व ध्यान पद्धतींचे मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते, असे त्यांनी यावेळी सांगितले.



यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास भाजपचे सरचिटणीस जयंत माहुरकर, सागर चौधरी, नगरसेविका सीमा नरवाडे, महिला मोर्चा अध्यक्षा अनिता आंबेकर, वैशाली सैतवाल, अंकिता पाटील, उपाध्यक्ष दिनेश राणे, शहर उपाध्यक्ष श्रेयस इंगळे, गुड्डूशेठ अग्रवाल, कैलास पाटील, रोहन वारुळकर, प्रेमचंद तायडे, शंकर शेळके, प्रशांत नेवे, प्रशांत नरवाडे, संयोजक मुकेश मोरे, सहसंयोजक प्रा.प्रशांत पाटील, अर्चना माहुरकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

