जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन दणदणीत मतांनी विजयी

भाजपच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जल्लोष


Mahayuti candidate Nandkishor Mahajan wins the Jalgaon Legislative Council election by a resounding margin जळगाव (22 जून 2026) : जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी अपेक्षेप्रमाणे दणदणीत विजय मिळवला. महायुतीचे महाजन यांना तब्बल 582 मते मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांना अवघी 17 मते मिळाली. एकूण 565 मतांनी महाजनांनी त्यांचा पराभव केला. महायुतीच्या विजयानंतर जिल्हाभर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

611 मतदारांनी बजावला हक्क
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार एकूण 611 मतदारांनी या निवणुकीत हक्क बजावला तर पाच मते अवैध ठरली. महायुतीचे नंदकिशोर महाजन यांना 582 तर महाविकास आघाडीचे तायडे यांना अवघी 17 मते मिळाली. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे कडेकोट पोलीस बंदोबस्तात आणि सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडली. निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

हरकतीची छाननी करून प्रक्रिया
मतमोजणीदरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनी काही वैध मते अवैध ठरवण्यात आल्याचा आरोप करत मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप नोंदविला. तसेच प्रशासन आणि भाजपमध्ये मिलीभगत असल्याचाही आरोप त्यांनी केला. मात्र सर्व हरकतींची छाननी करून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

महायुतीचा जिल्हाभरात जल्लोष
अंतिम निकालात नंदकिशोर महाजन यांनी 582 मते मिळवली व विजयाची पताका फडकवली. या निकालामुळे जळगाव जिल्ह्यात महायुतीचे राजकीय वर्चस्व पुन्हा स्पष्ट झाले तर निकाल जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटप आणि घोषणाबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला. जिल्ह्यातील विविध भागांत आनंदोत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. शेतकरी पूत्राची या माध्यमातून आता स्थानिक स्वराज्य संस्थेत एन्ट्री झाली असून आता महाजनांकडून अपेक्षा वाढल्या आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !