मध्य रेल्वेच्या अपर महाव्यवस्थापकांकडून भुसावळ विभागाची व्यापक पाहणी


Comprehensive inspection of the Bhusawal Division by the Additional General Manager of Central Railway भुसावळ (24 जून 2026) : मध्य रेल्वेचे अपर महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांनी बुधवार, 24 जून 2026 रोजी भुसावळ विभागाची व्यापक पाहणी केली. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विविध विभागांना दिल्या भेटी
अपर महाव्यवस्थापक यांनी क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्था (झेडटीआरआय) भुसावळ येथे आयोजित केंद्रीय प्रशिक्षण सल्लागार समितीच्या बैठकीला उपस्थिती दिली. या बैठकीत प्रशिक्षण कार्यक्रम, संस्थेतील पायाभूत सुविधा, उपलब्ध संसाधने तसेच भविष्यातील आवश्यकतांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर त्यांनी संस्थेतील विविध सुविधा व प्रशिक्षण व्यवस्थेची पाहणी केली. प्रशिक्षणाची गुणवत्ता, उपलब्ध संसाधने आणि भविष्यातील गरजा यांचे परीक्षण करून संबंधित अधिकार्‍यांना आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या.


प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद
क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांशी त्यांनी संवाद साधून त्यांच्या प्रशिक्षणातील अनुभव व सूचना जाणून घेतल्या. यावेळी मेसची पाहणी करून भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता आणि इतर व्यवस्थांचा आढावा घेतला व आवश्यक सुधारात्मक उपाययोजनांसाठी संबंधित अधिकार्‍यांना निर्देश दिले. याच प्रसंगी क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘रेल प्रशिक्षण दर्पण’ या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

सामग्री भांडारची केली पाहणी
अपर महाव्यवस्थापक यांनी विभागीय सामग्री भांडारची पाहणी करून सामग्री व्यवस्थापन, साठवण व्यवस्था तसेच उपलब्ध संसाधनांच्या कार्यक्षम वापराचा आढावा घेतला.

त्यानंतर त्यांनी विभागीय रेल्वे रुग्णालय, भुसावळ येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी रुग्णालयात नव्याने उभारण्यात आलेल्या डिजिटल रेडिओग्राफी कक्षाचे उद्घाटन त्यांच्याहस्ते करण्यात आले. त्यांनी ऑपरेशन थिएटर, विविध वैद्यकीय सुविधा तसेच रुग्णांच्या उपचार व देखभाली संदर्भातील व्यवस्थेची पाहणी करून रुग्णालय प्रशासनामार्फत पुरविण्यात येत असलेल्या आरोग्यसेवांचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान अपर महाव्यवस्थापक यांनी विविध विभागांच्या अधिकार्‍यांसमवेत कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार आणि अधिक चांगल्या रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !