भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप
संस्थाध्यक्ष मकरंद नारखेडे यांचा सपत्नीक भव्य गौरव : अभ्यासात सातत्य ठेवा : मकरंद नारखेडे
Pats of appreciation on the backs of meritorious students at K. Narkhede School in Bhusawal भुसावळ (25 जून 2026) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये दहावी-बारावी परीक्षेत अव्वल गुण प्राप्त गुणवंतांचा गौरव गुरुवार, 25 रोजी दुपारी करण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष मकरंद नारखेडे यांना ‘फेलो ऑफ दि सोसायटी’ गौरव पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यांची विचार मंचावर उपस्थिती
प्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे सपत्नीक उपस्थित होते तसेच संस्थेचे ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, मुख्याध्यापिका अॅड.संगीता अडकमोल, उपमुख्याध्यापक एस.पी.पाठक, संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील, पर्यवेक्षक एस.एल.राणे, बी.बी.जोगी, के.नारखेडे कॉलेज ऑफ सायन्सचे प्राचार्य श्रीवास सर, भुसावळातील दिव्य मराठीचे ब्युरोचीफ हेमंत जोशी, अॅड.पी.ई. नेमाडे, जिल्हा बँकेचे यावल तालुका विभागीय उपव्यवस्थापक पी.एन.राणे आदींची उपस्थिती होती.


मकरंद नारखेडे यांचा सपत्नीक सत्कार
प्रास्ताविक संगीता अडकमोल यांनी केले. संस्थाध्यक्ष मकरंद नारखेडे यांना पुरस्कार मिळाल्याने संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील तसेच के. नारखेडे विद्यालयातर्फे शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता अडकमोल यांनी तसेच के.एन.सी.टी.आयतर्फे बी.ए.पाटील व सारिका भारंबे यांनी सत्कार केला. संस्था क्लार्क प्रमोद तळेले व वंदना वारके यांनीही डॉ.मकरंद नारखेडे यांचा सपत्नीक सत्कार केला. एन.के.नारखेडे कॉलेज ऑफ सायन्सचे प्राचार्य श्रीनिवास, एन.के.नारखेडे सी.बी.एस.ई.स्कूल दीपनगरतर्फे धनश्री भारंबे तर अॅड.पी.ई.नेमाडे, पत्रकार हेमंत जोशी, डोंगरकठोरा विकासोचे चेअरमन प्रभाकर एन.राणे यांनीही मकरंद नारखेडे यांचा सत्कार केला.
गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप
उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात बारावी विज्ञान शाखेतून प्रथम वैभवी सोनार, द्वितीय मयुरेश चौधरी, वाणिज्य शाखेतून प्रथम जतीन पाटील, द्वितीय मनन जटाळे, कला शाखेतून प्रथम स्नेहा शेळके व द्वितीय प्रणय महाले, यांना बक्षीस देऊन गौरवांकित करण्यात आले. तद्नंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीमधून प्रथम भाग्यश्री चौधरी व श्रुती चौधरी, द्वितीय लावण्या सूर्यवंशी तसेच प्रत्येक विषयामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवी दिल्लीतर्फे घेण्यात आलेल्या सायन्स ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये सुवर्ण व रजत पदक मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून इयत्ता दहावीची विद्यार्थिनी लावण्या सूर्यवंशी हिने मनोगत व्यक्त केले.
अभ्यासात सातत्य ठेवा : मकरंद नारखेडे
प्रमुख अतिथी डॉ.मकरंद नारखेडे म्हणाले की, अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश निश्चित मिळेल. पी.व्ही.पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कांचन राणे, बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे यादीवाचन वर्षा कुरकुरे तर एस.डी.वासकर यांनी तर अतिथी परिचय एम.व्ही.कुलकर्णी यांनी केले. ऑलिम्पियाड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन एस.एस.कापसे यांनी तर आभार पर्यवेक्षक एस.एल.राणे यांनी मानले.
