पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा दावा : ठाकरे गटातील 14 हून अधिक आमदार शिंदे सेनेत येणार !


Guardian Minister Gulabrao Patil claims: More than 14 MLAs from the Thackeray faction will join the Shinde Sena मुंबई (26 जून 2026) : जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे 14 पेक्षा अधिक आमदारही शिंदे गटाच्या संपर्कात असून लवकरच मोठा राजकीय भूकंप होईल, असा दावा केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अलीकडेच ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करीत सहा खासदार शिंदेसेनकडे आल्यानंतर राजकीय कलगीतुरा रंगत असतानाच गुलाबरावांनी ऑपरेशन 3 बद्दल चर्चा केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त करीत ते म्हणाले की, शिंदे साहेब जास्त बोल त नाही मात्र दाढीवर हात फिरवतात म्हणजे ऑपरेशन टायगर यशस्वी होणार, हे निश्चित, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

शिंदेंनी दाढीवर हात फिरवला की ’ऑपरेशन’ यशस्वी
गुलाबराव पाटील पुढे बोलताना म्हणाले की, ऑपरेशन 3.0 ला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे जास्त बोलत नाहीत, ते फक्त दाढीवर हात फिरवतात. जेव्हा ते दाढीवर हात फिरवतात, तेव्हा ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी होते. हे खुद्द उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनीही कबूल केले आहे. या शब्दांत त्यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला.



उद्धव ठाकरेंच्या दौर्‍यावर खोचक टोला
फुटलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे उद्यापासून तीन दिवसांचा दौरा करणार आहेत. या दौर्‍याबाबत विचारले असता गुलाबराव पाटील यांनी खोचक टोला लगावला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघात फिरलेच पाहिजे; मुलाने (आदित्य ठाकरेंनी) काम केले नाही, तर बापाने ते केलेच पाहिजे.

संजय दिना पाटलांना सल्ला
पत्रकारांना शिवीगाळ केल्याप्रकरणी वादात सापडलेले खासदार संजय दिना पाटील यांना गुलाबराव पाटलांनी जाहीर सल्ला दिला आहे. पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ आणि आपला आरसा आहे, आरशाला दगड मारू नये. राजकारणात वाद होत असतात, पण मारामारी किंवा शिवीगाळ करणे चुकीचे आहे. संजय दिना पाटील यांनी या प्रकरणी ‘सॉरी’ म्हणायला काहीच हरकत नाही, असे खडेबोल त्यांनी सुनावले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !