मुंबईचे खासदार संजय पाटील यांच्या वक्तव्याचा मुदखेडमध्ये तीव्र निषेध : तहसीलदारांना निवेदन


मुदखेड (26 जून 2026) : मुंबईचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिलेल्या धमकीवजा भाषेचा मुदखेड येथील मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. या संदर्भात पत्रकारांच्या शिष्टमंडळाने मुदखेडचे तहसीलदार यांना निवेदन सादर करून कारवाईची मागणी केली.

लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला
गुरुवार, 25 जून रोजी मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना उद्देशून धमकीवजा भाषा वापरली होती. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा थेट घाला आहे, अशी तीव्र भावना या नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव ईश्वर पिन्नलवार यांनी निवेदन देताना व्यक्त केली आहे.



खासदारांवर व्हावी कारवाई
मुदखेड नायब तहसीलदार पाटील, नायब तहसीलदार मारोती जगताप, नायब तहसीलदार संतोष कामठेकर यांना दिलेल्या निवेदनात पत्रकारांनी मागणी केली, की शासन दरबारी या तीव्र भावना पोहोचवून खासदार संजय दिना पाटील यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच पत्रकारांना आपले कर्तव्य निर्भयपणे बजावता यावे यासाठी त्यांना योग्य ते संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवेदन देताना मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सहसचिव ईश्वर पिन्नलवार, मनोज कमटे, प्रताप देशमुख, गंगाधर डांगे, सिद्धार्थ चौदंते, साहेबराव गगलवाड, धम्मदाता कंबळे, हफीज कुरेशी, साहेबराव हौसरे यांच्यासह पत्रकार बांधवांनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !