केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार ? : जाणून घ्या कुणाला संधी, कुणाला मिळणार डच्चू


Union Cabinet expansion tomorrow ? Find out who gets a chance and who gets the axe नवी दिल्ली (29 जून 2026) : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी विदेशातून भारतात येतील आणि पुन्हा परवा दुसर्‍या दौर्‍याला जाण्याची शक्यता असल्याने मंगळवार, 30 रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात शिवसेनामध्ये आलेले खासदार, तृणमूलचे फुटीर खासदार, आपचे खासदार यापैकी काहींना संधी तसेच आधीच्या काही मंत्र्यांना डच्चू मिळून नवीन चेहर्‍याना संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडे यावेळी एक कवीने मंत्रीपद येणार अशी सूत्रांची माहिती आहे. त्यासाठी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव चर्चेत आहे.

श्रीकांत शिंदे यांना मंत्रीपदाची शक्यता
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे तर राज्यमंत्री पदासाठी प्रतापराव जाधव यांच्याऐवजी संजय जाधव यांच्या नावाची चर्चा आहे.



‘ऑपरेशन टायगर’च्या यशानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. कॅबिनेट मंत्रीपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे तर एक राज्यमंत्रीपद ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेल्या सहा खासदारांपैकी एकाला मिळण्याची शक्यता आहे. या मंत्रिपदासाठी परभणीचे खासदार संजय उर्फ ‘बंडू’ जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. संजय जाधव सलग तिसर्‍यांदा परभणीचे खासदार म्हणून निवडून आले आहेत.

या मंत्र्यांना मिळू शकतो डच्चू ?
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी, रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू, वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी, सहकारीता राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा, अल्पसंख्यांक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांना डचू मिळू शकतो.

कुणा-कुणाला मिळणार संधी ?
शक्तीकांत दास, अनुराग ठाकूर, व्ही.डी.शर्मा, तरुण चुग, राघव चड्डा, श्रीकांत शिंदे, संजय दीना पाटील, काकोली घोष दस्तीदार, अरुण गोविल यांच्या नावांची चर्चा असलीतरी ऐनवेळी कुणाला संधी मिळेल? याकडे लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !