भुसावळात नालेसफाई न झाल्यास नगरपालिकेच्या आवारात कचरा फेको आंदोलन करणार : मनसेचा इशारा


MNS warns of ‘dumping garbage’ protest at the municipal council premises in Bhusawal if drain cleaning is not carried out भुसावळ (30 जून 2026) : शहरात पावसाळ्याला सुरूवात होवूनही अद्यापही नालेसफाई न झाल्याने नाल्याकाठी राहणार्‍या नागरिकांचे आरोग्य व जीव धोक्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने शहरात पावसाळ्यापूर्वी एप्रिल-मे महिन्यात नालेसफाई अपेक्षित होती मात्र अद्यापही नालेसफाई सुरू झालेली नाही. यापूर्वी मंगळवार, 2 जून 2026 रोजी नाले सफाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले मात्र त्यानंतरही दखल घेण्यात न आल्याने आता नालेसफाई न झाल्यास पालिका आवारात कचरा आणून टाकल्याचा इशारा मनसे पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

आपत्ती व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर
शहरातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा साचला आहे, तसेच काटेरी झाडे-झुडूपे उगवली आहे. यामुळे सांडपाणी व पावसाचे पाणी तुंबते. नाल्यांसह गटारी ही तुंबल्या असून पावसाळा सुरू होताच नाल्यांच्या काठावरील खडका रोड, रजा चौक, पापा नगर, पंचशील नगर, मरीमाता मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स, मामाची टॉकीज मागील भाग, भोई नगर, ताडीचा मळा या भागातील खोलगट भागात पाणी साचून आपत्ती व्यवस्थापनाचा प्रश्न उदभवू शकतो शकतो.



तर कचरा आणून टाकणार
सोमवार, 15 जुलै 2026 पर्यंत शहरातील नाल्यांची सफाई न झाल्यास नाल्यातील कचरा थेट नगरपालिकेच्या आवारात टाकण्यात येईल, असा इशारा भुसावळ पालिका उपमुख्याधिकारी परवेज व मोरे यांना देण्यात आला. जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे , जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलेल्या निवेदनप्रसंगी शहराध्यक्ष दीपक सोनवणे, तालुका सचिव विलास कोळी, सुशील मोरे, तालुका उपाध्यक्ष दशरथ सपकाळे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष प्रणय भागवत, दुर्गेश चोपडे आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !