भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे करिअरवर मार्गदर्शन


भुसावळ (4 जुलै 2026) : ध्येयाचे पंख घेऊनी उंच आकाशी झेपाव, कष्टाच्या वाटेवरती यशाचे शिखर गाठाव, मार्गदर्शनाची साथ मिळता खडतर प्रवासही सोपा होतो, योग्य दिशेने चालूनिया आपला भविष्यकाळ घडवावा या प्रेरणादायी संदेशाला अनुसरून भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात शुक्रवार, 3 जुलै 2026 रोजी रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी संस्थेचे सदस्य विकास पाचपांडे होते. प्रमुख व्याख्याते म्हणून पुणे येथील प्रख्यात करिअर मार्गदर्शक योगेश यावलकर होते. कार्यक्रमास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अ‍ॅड.संगीता अडकमोल, उपमुख्याध्यापक एस.पी.पाठक, पर्यवेक्षक बी.बी.जोगी, संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील, रोटरी क्लबचे चेअरमन मंगेश यावलकर, संदीप जोशी, सेक्रेटरी राहुल पांडे, विद्यालयाचे माजी विद्यार्थी समीर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

दहावी-बारावीनंतर करीयरच्या विपूल वाटा
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा परिचय अमित भडंग यांनी करून दिला. मार्गदर्शन करतांना योगेश यावलकर यांनी दहावी व बारावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक व व्यावसायिक संधी, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, व्यक्तिमत्त्व विकास तसेच आधुनिक काळातील करिअरच्या नव्या वाटा यांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी, क्षमता आणि कौशल्यांचा योग्य वापर करून ध्येय निश्चित करावे व त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
सूत्रसंचालन एस.डी.वासकर यांनी केले. माजी विद्यार्थी समीर चौधरी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. यशस्वीतेसाठी संदीप पाटील, व्ही.एस.राणे, जी.व्ही.पाटील, रिता महाजन, तेजस्विनी नेमाडे ,नवीन नेमाडे, जयेश बर्‍हाटे, मुकेश पाटील यांनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !