अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा करताच शेअर मार्केट क्रॅश : गुंतवणूकदारांचे आठ लाख कोटी स्वाहाः
Stock market crashes following US President Donald Trump’s announcement; investors lose ₹8 lakh crore.
मुंबई (8 जुलै 2026) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी संपल्याचं जाहीर करताच सेन्सेक्स आणि निफ्टी क्रॅश होवून गुंतवणूकदारांचे तब्बल आठ लाख कोटी स्वाहाः झाले. निफ्टी 50 निर्देशांक 23897 अंकावर बंद झाला तर सेन्सेक्स 1658 अंकांनी घसरुन 76522 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टीमध्ये 1458 अंकांची घसरण होऊन निर्देशांक 56742 वर बंद झाला.
आठ लाख कोटींचे नुकसान
बीएसईवरील आकडेवारीनुसार बुधवारी गुंतवणूकदारांचं तब्बल 8 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 480 लाख कोटींवरुन घसरुन 472 लाख कोटींवर आलं आहे. म्हणजेच जवळपास गुंतवणूकदारांचं एका दिवसात आठ लाख कोटी रुपयांचं नुकसान झाले. शेअर बाजारातील प्रमुख 16 सेक्टर्स पैकी 13 सेक्टरमध्ये घसरण झाली. स्मॉल कॅप आणि मिड कॅप 0.03 टक्क्यांनी घसरले.

घसरणीने झाली सुरूवात
भारतीय शेअर बाजाराची आजची सुरुवात घसरणीसह झाली होती. दुपारपर्यंत निर्देशांकावर दबाव होता. बँकिंग शेअरमधील घसरणीमुळं बँक निफ्टीत घसरणीसह ट्रेडिंग सुरू राहिले तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी दुपारी इराण सोबतची शस्त्रसंधी संपल्याचं जाहीर करताच क्रूड ऑईलचे दर 78 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. यामुळं शेअर बाजारात घसरण झाली.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम झाल्यानं स्मॉल कॅप, लार्ज कॅप शेअरमध्ये देखील घसरण झाली. सर्वाधिक घसरण जिओ फायनान्शिअल, श्रीराम फायनान्स, इंटरग्लोब एविएशन, यूनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी असेटस मॅनेजमेंट, मारुती सुझुकीच्या शेअरमध्ये घसरण झाली.
निफ्टीच्या जवळपास सर्व निर्देशांकात घसरण झाली. निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक 1.97 टक्क्यांनी घसरला. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 1.57 टक्क्यांनी घसरला. ऑईल अँड गॅस निर्देशांक 1.5 टक्क्यांनी घसरला. शेअर बाजारात तेल विपणन कंपन्या, रंग बनवणार्या कंपन्या, हवाई वाहतूक कंपन्या आणि टायर बनवणार्या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी संपल्याचं समोर येताच आशियाई बाजारांवर देखील दबाव पाहायला मिळाला. जपान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, चीनच्या बाजारात देखील घसरण झाली आहे. इंडिया विक्स निर्देशांक 15 वर पोहोचला आहे.