जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 20 जुलै रोजी आयोजन
जळगाव (मंगळवार, 14 जुलै 2026) : समस्याग्रस्त व पीडित महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी व अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी आणि समाजातील पीडित महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसर्या सोमवारी राबविण्यात येतो.
त्यानुषंगाने जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार, 20 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ऋषिकेश काळे यांनी प्रसिद्घीपत्रकाद्वारे कळविले आहे.

